लातूर: मांजरा परिवार म्हणजे विश्वासार्हता, पारदर्शकता, शेतकऱ्यांचे हित या त्रिसूत्रीवर आधारलेली सहकार चळवळ आहे. श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना मांजरा परिवारात यावा हा शेतकऱ्यांचा आग्रह आहे. त्यासाठी विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात कारखान्याची निवडणूक लढवली जात आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी सदील पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांधिक्याने विजयी कारावे असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
या संदर्भाने आवाहन करताना आमदार दिलीपराव देशमुख यांनी म्हटले आहे की, सध्या श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रिया सुर आहे. सदरील निवडणुकीत लोकांच्या आग्रहावरुन मांजरा परिवाराच्या वतीने विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून नव्या चेहऱ्यांना संधी देवून निवडणुक रिंगणात उतरले आहे. मांजरा परिवाराला ३० वर्षाची उज्वल परंपरा आहे. या वाटचालीत मांजरा परिवाराचा राज्यातच नव्हेतर संपूर्ण देशातील कारखानदारीत नाव लौकीक झालेला आहे. हा परिवार विश्वासाहर्त, शेतकऱ्यांचे हित, पादर्शक कारभार आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव या गुणवैशिष्टयासह सहकार चळवळीत वाटचाल करीत आहे.
श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना मांजरा परिवारात सहभागी झाला तर कारखाना कार्यक्षेत्र आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक क्रांती येणार आहे याची जाणिव ठेवून शेतकरी सभासदांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आमदार अमित विलासराव देशुख यांच्या नेतृत्वात निवडणुक लढवत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी कले आहे.
Comments