मातोळा: संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याची निवडणुक शेतकऱ्याच्या हिताची, शेतकऱ्यांच्या चुलिशी नातं सांगणारी असल्याने मातोळा गटातील सांगता सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची उपस्थिति पाहता या निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनल विजयाचा बॉयलर पेटणार हे सुनिश्चित झाले आहे. या कारखान्याची ही निवडणुक बिनविरोध होणार होती. काही लोकानी आपल्या राजकीय हितासाठी निवडणुक लादून आपली राजकीय संधी साधण्याचा प्रयत्न केला यामूळे ही निवडणूक लागली असल्याची टिका आमदार अमित देशमुख यानी केली. विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या उमेद्वारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर सभेच्या अध्यक्षस्थानी मातोळाचे माजी सरपंच विनायकराव पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष एस आर देशमुख, नारायण लोखंडे, मांजराचे माजी व्हा धनंजय देशमुख, श्रीशैल्य उटगे, रेनाचे चेयरमन सर्जेराव मोरे. उदय देशमुख, अमर भोसले, विध्याताई पाटील, स्वयप्रभा पाटील, कल्याण पाटील, मनोज पाटील राष्ट्रवादी कांग्रेसचे सुभाष पवार आदी उपस्थित होते
आमदार अमित विलासराव देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, औसा तालुक्यात राजकीय भविष्य अजमावण्यासाठी किल्लारी येथील साखर कारखाना चालू केल्याचे फलकबाजी करुण पाठ थोपटून घेतली, त्याना शेतकऱ्याच्या विषयी कळवला असेल तर किल्लारीचे बॉयलर पेटवून दाखवावे असे आवाहन त्यानी दिले.
पुढे बोलताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावाने हे पॅनल तयार केला असून पॅनलचे मार्गदर्शक शिवराजजी पाटील चाकूरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी हम सब एक है त्यामुळे या निवडणुकीत अफवा सोडणाऱ्या लोकानासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच येणाऱ्या काळात उसाची चिंता करू नका मांजरा परिवार समर्थ आहे. त्यामुळे लोकनेते विलासराव देशमुख विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
Comments