HOME   लातूर न्यूज

‘मांजरा परिवारात’ येण्यासाठी शेतकरी उत्सुक- आ. अमित देशमुख

श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणूक


‘मांजरा परिवारात’ येण्यासाठी शेतकरी उत्सुक- आ. अमित देशमुख

लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी थांबुन आज प्रत्यक्ष मतदान होत आहे. कारखान्याच्या आणि आपल्या स्वत:च्या भविष्यासाठी बहुतेक सर्व शेतकरी सभासद बांधवांनी ‘मांजरा परिवारात’ सहभागी होण्याचा निर्धार केला आहे, त्यामुळे विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार विक्रमी मतानी विजयी होतील असा विश्वास पॅनल प्रमुख आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यकत्‍ केला आहे.
निवडणुकीच्या पूर्व संध्येला बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, मागची अनेक वर्ष औसा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. किल्लारी, मारुती महाराज हे कारखाने बंद असल्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. जिल्ह्या बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला परंतू त्याचा योग्य मोबदला दिला नाही. काही शेतकऱ्यांचा ऊस मांजरा परिवारातील कारखान्यांनी नेला त्यांना मात्र योग्य भाव आणि सन्मान मिळालेला आहे. हा सन्मान सतत मिळत राहावा यासाठी मारुती महाराज कारखाना मांजरा परिवारात सहभागी करुन घेण्याचा आग्रह शेतकरी सभासदांनी आदरणी दिलीपराव देशमुख आणि माझ्याकडे धरला होता. त्यांच्या आग्रहास्तव आम्ही विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनल निवडणुक रिंगणात उतरवले आहे. या निवडणुक प्रचारादरम्यान पॅनलला मतदारांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत राहीला. आज प्रत्यक्ष मतदान होत असून मारुती महाराज साखर कारखाना मांजरा परिवारात सहभागी होण्याच्या प्रक्रियेवर शेतकरी सभासद शिक्कामोर्तब करणार आहेत.


Comments

Top