लातूर: लातूर शहरातील वंजारी समाज बांधवांचा परिचय व एकता मेळावा रविवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. येथील नवीन रेणापूर नाक्यालगतच्या विष्णुदास मंगल कार्यालयात या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे.
आगळा-वेगळा यासाठी की, कार्यक्रम म्हटले की स्वागताध्यक्ष, अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मान्यवरांचा समावेश असतो. परंतू, वंजारी समाजातील तरुणांनी या सगळ्या मानपानाला फाटा देत ना अध्यक्ष, ना स्वागताध्यक्ष की प्रमुख पाहुणा. कार्यक्रमाला येणारे सगळेचजण मान्यवर असतील, अशी संकल्पना मांडली आहे. लातूर शहरातील स्थानिक वंजारी बांधवांसह जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून लातुरात स्थायिक झालेल्या डॉक्टर्स, इंजिनिअर, प्राध्यापक, वकील, व्यापारी, उद्योजक, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, कामगार अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाज बांधवांना एकत्र आणून त्यांची एकमेकांशी ओळख व्हावी, या हेतूने हा परिचय मेळावा आयोजिला आहे. या परिचय मेळाव्यात प्रत्येकजण आपापली ओळख सांगणार आहे. याच कार्यक्रमात संगीत रजनीचा कार्यक्रमही ठेवला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, या परिचय व एकता मेळाव्यास वंजारी समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वंजारी समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments