लातूर: मराठवाड्यात व लातूर जिल्ह्यात अत्यंत अल्प पाऊस झाल्यामुळे शेती नापीक झाली. जिल्ह्यातील बहुतेक तलावामध्ये उन्हाळ्यापेक्षा कमी पाणीसाठी असल्यामुळे पाणी प्रश्नही निर्माण झाला आहे. सन १९७२ च्या दुष्काळापेक्षा सध्याचा दुष्काळ भीषण होण्याची चिन्हे दिसत आहेत. सन २०१७-१८ मध्येही दुष्काळी परिस्थितीत विम्याची मदत शेतकर्यांना मिळाली नाही. सोयाबीन ऑनलाईन नोंदणी करणार्याला १००० रू अनुदान शासनाने जाहीर केले, ते अद्याप मिळाले नाही. कर्जमाफी जाहीर करूनही अनेक शेतकरी वंचीत आहेत.या सर्व परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात भितीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यामध्ये अनेक शेतकर्यांनी आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न समजून त्याला आत्मविश्वास व आधार देण्यासाठी ग्रामीण भागातील प्रश्न अधिक समजून घेऊन त्याला वाचा फोडण्यासाठी २६ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर दरम्यान ५४ गावात माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली जनसंवाद यात्रा काढणार असून यात्रेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जननायक संघटनेचे उपाध्यक्ष सुर्यकांराव शेळके, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुका अध्यक्ष माधवराव गायकवाड, बाबासाहेब देशमुख, रविंद्र कांबळे, श्रीकांत झाडके केले आहे.
Comments