लातूर: विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ संस्थापक चेअरमन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २३ ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता होणार आहे. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन विजयादशमीचे शुभमुहूर्तावर झाले असून गळीत हंगाम २०१८-१९ चा शुभारंभ कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते व आमदार त्रयबंक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांचे प्रेरणेने, माजी मंत्री मा.श्री. दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व माजी राज्यमंत्री आमदार तथा संस्थापक चेअरमन आ अमित देशमुख व चेअरमन वैशालीताई देशमुख यांचे नेतृत्वाखाली सुरु आहे. कारखाना उभारणीनंतर चाचणी हंगामापासून झालेले सर्व हंगाम यशस्वीपणे पार पडले आहेत. विलास कारखान्याची यशस्वी वाटचाल ही साखर उद्योगात सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. यामूळे कारखान्यास राज्य आणि देशपातळीवरची २३ पारितोषीके मिळाली आहेत. सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी - वाहतूक ठेकेदार, हितचिंतकानी गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास मंगळवार दिनांक २३ ऑक्टोंबर २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे व संचालक मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
Comments