औसा: संत शिरोमणी मारूती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलचे सर्व १६ उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत, भाजप प्रणित पॅनलच्या पराभव झाला आहे या विषयावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यानंतर आमदार अमित देशमुख बोलत होते ते म्हणाले की, मांजरा परिवाराने मागच्या चाळीस वर्षात जे काम केले आहे त्याची पावती म्हणजे हा विजय आहे. या विजयाचे सारे श्रेय लोकनेते विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवार उभा करून जो विचार रुजवला आहे त्याला जाते, आपले नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी तो आदर्श निर्माण केला आहे त्याला जाते, त्याचबरोबर जिल्ह्यात सहकार चळवळीला ज्यांनी भक्कम आधार दिला आहे ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी या विजयाचे श्रेय जाते या निवडणुकीत शेतकरी हाच आपला पक्ष, आपली जात असे समजून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली राजकीय वस्त्र बाजूला ठेवून विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनला पाठींबा दिला ते सर्वजण विजयाच्या श्रेयाचे हक्कदार असल्याचेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षानेही या निवडणुक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले होते, पण का कुणास ठाऊक त्यांनी अगोदरच अडचणीत असलेल्या कारखान्यावर का निवडणूक लादली लोकांना त्यांची ही कृती आवडली नाही, म्हणूनच त्यांना मोठा पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणूक लागताच आम्ही लोकांपर्यत गेलो आमचे भूमिका त्यांना सांगितली शेतकऱ्यांनाही आमची भूमिका आवडली आणि त्याचा परिणाम समोर आला आहे, आता आमची जबाबदारी वाढली आहे अधिक चांगले काम करून हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत.
Comments