लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळविल्यानंतर पॅनलचे प्रमुख आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व सहकारी व नवनिर्वाचित संचालकासह आशियाना निवासस्थानी जावून पहिली विजयी पुष्पमाळ माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या गळयात घातली. मांजरा परिवाराने लोकामध्ये जो विश्वास निर्माण केला आहे त्याची पावती म्हणजे मारुती महाराज साखर कारखान्यावरील विजय होय. या विजयामुळे आणीखीन आपली जबाबदारी वाढली आहे. आधिक चांगले काम करुन मांजरा परिवारात पुन्हा दाखल झालेला मारुती महाराज साखर कारखाना चालू करुन चांगला चालवावा अशा शुभेच्छा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नुतन संचालक व पॅनल प्रमुख तसेच समर्थकांना दिल्या. मतदार सुज्ञ आहेत, मांजरा परिवाराची कामगीरी आणि सहकार्य लक्षात घेवून ते विकासरत्न विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने कौल देतील असा आमचा विश्वास होता असे सांगून उमेदवारी व इतर कारणांमुळे नाराज झालेल्या सहका-यांनी शेवटच्या टप्प्यात योग्य भूमिका घेतली याबद्दल त्यांचेही दिलीपराव देशुख यांनी कौतूक केले. शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी यांच्या भूमिकेचे कौतूक करुन त्यांचेही त्यांनी आभार मानले. शेवटी पॅनल समन्वयक एस.आर. देशमुख यांनी सर्व सहकाऱ्यांचे कौतूक केले. यावेळी आमदार त्र्यंबक भिसे, काँग्रेसचे जेष्ठ नेते विक्रम हिप्परकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, कृउबा समितीचे सभापती ललितभाई शाह, मांजरा कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैल्य उटगे, रामदास चव्हाण, स्वंयप्रभा पाटील, बबन भोसले, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष पवार, रेणाचे संचालक प्रविण पाटील, सचिन दाताळ, नुतन संचालक अमित माने, (शिंदे) पाटील विलास, शाम भोसले, सचिन पाटील, हरिश्चंद्र यादव, शामराव साळुंके,झिरमीरे अनिल, भुरे सुरेश, बाजुळगे गणपती, पवार सुरेश, शिंदे गितेश, भोसले अर्चना, जगताप स्नेहल, माळी हणमंत आदी उपसिथत होते.
Comments