HOME   लातूर न्यूज

यशवंत पंचायतराज पुरस्काराने लातूर जिल्हा परिषद सन्मानित

मुंबईतील समारंभात स्वीकारला पुरस्कार


यशवंत पंचायतराज पुरस्काराने लातूर जिल्हा परिषद सन्मानित

लातूर: यशवंत पंचायतराज अभियान २०१८ अंतर्गत लातूर जिल्हा परिषदेने विभाग स्तवरावरील प्रथम पुरस्कार पटकावला असून मुंबईत राज्यपाल सी.विद्यासागर राव आणि ग्रामविकास तथा महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यशवंत पंचायतराज अभियानाअंतर्गत लातूर जिल्हा परिषदेने उत्कृ‍ष्ट कार्य केले. या कार्याची दखल घेऊन लातूर जिल्हा परिषदेला औरंगाबाद विभागातून प्रथम पुरस्का्र जाहीर झाला होता. शुक्रवारी मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात राज्यपाल सी.विद्यासागर राव, ग्रामविकास तथा महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, बांधकाम व आरोग्य सभापती प्रकाश देशमुख, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन ईटनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे व उदयसिंह सोळुंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जवळगेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
विभागीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केली. आज आम्ही कामाच्या माध्यमातून विभाग पातळीवरील पुरस्कार मिळवला आहे. यापेक्षाही अधिक काम करुन राज्य व देशपातळीवरील पुरस्कार मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे मत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह पदाधिका-यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


Comments

Top