लातूर: भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण आठ मार्च २०१९ या जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी औरंगाबाद महसुली विभागातील आठ जिल्ह्यातून नामांकने मागविण्यात येत आहेत. यामध्ये वैयक्तीक पुरस्कार व स्वयंसेवी संस्था स्तरावरील पुरस्काराचा समावेश आहे. नामांकने सादर करण्यासाठी आवश्यक पात्रता, निकष व नमुना अर्ज इत्यादीची माहिती केंद्र शासनाच्या http//www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तेंव्हा यासाठी औरंगाबाद विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात २९ ऑक्टोबर २०८ पर्यंत संबंधितांनी नामांकने सादर करावीत. त्यानंतर प्राप्त झालेली नामांकने, अर्ज स्वीकारली जाणार नाहीत, असे विभागीय उपआयुक्त, महिला व बालविकास, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments