लातूर: लातूर शहरातील पालक संघाच्या शिष्टमंडळाने भारतीय काँग्रेसचे पक्षाचे सचिव माजी माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची बाभळगाव येथिल निवासस्थानी भेट घेवून खाजगी क्लासेसला रविवारची सुट्टी रद्द करावी, अशी मागणी केली होती, त्याबाबत अखिल आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी जी.श्रींकात यांनी याबाबत पालकांच्या मागणीचा विचार करावा अशी सुचना पत्राद्वारे केली होती.
याबाबत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारची सुट्टी रद्द आदेशात शिथीलता आणून दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेला परवानगी दिली आहे. लातूर शहरातील विद्यार्थ्यांवर पडणारा खाजगी शिकवणीचा सततचा मानसिक ताण कमी व्हावा म्हणून जिल्हाधिका्ऱ्यांनी खाजगी क्लासेसला रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.
स्पर्धेच्या युगात रविवारची सुट्टीमुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असल्याची भावना विद्यार्थ्यांची व पालकांची झाली होती. या सुट्टीच्या दिवशी खाजगी क्लासेसकडून विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतली जात होती ती पुर्ववत करावी, त्यामुळेच क्लासेसची रविवारची सुट्टी रद्द करण्याबाबत लातूर शहरातील पालक संघाने विनंती केली होती.
Comments