HOME   लातूर न्यूज

शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

पालकमंत्री निलंगेकरांची बीड जिल्ह्यात पीक पाहणी दरम्यान ग्वाही


शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

बीड: जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकर्‍यांच्या उन्नतीसह हितासाठी केंद्र व राज्य सरकार बांधील आहे. मात्र निर्सगाच्या अवकृपेने मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे सकंट उभे टाकले आहे. या संकटावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही राज्याचे कामगार व माजी सैनिक कल्याण,कौशल्य विकास तथा भुकंप पुर्नवसन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव व बीड तालुक्यातील वडवणी, ढोरवाडी, कान्हापुर, लक्ष्मीपुर,पोखरी, घाटसावळी, नित्रुड, पार्थुड व धारुर या गावातील शिवारात थेट शेतीबांधावर जाऊन संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पावसाअभावी नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी केली. यामध्ये कापुस, सोयाबीन व तुर पिकांचा समावेश होता, या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी एम.डी. सिंग, बीड भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे,रमेश आडसकर, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार, तहसीलदार सुनील पवार, चंद्रकांत फड, भुषण पाटील, धारुर नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंग हजारी, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष दत्ताभाऊ घोगरे, नगरसेवक सुरेश लोकरे, तहसीलदार झांझलवार, चंद्रकांत फड,माजलगांव शहराध्यक्ष बबन साळुंके, तालुकाध्यक्ष हणमंत कदम, कॉ. सुभाष डाके, माजी सभापती नितिन नाईकनवरे, आदीसह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे ना. निलंगेकर यांचा हा पिक पाहणी दौरा दुपारी 3 च्या दरम्यान सुरु झाला होता. मात्र शेतकर्‍यांच्या व्यथा व झालेला नुकसानीची माहिती घेत असताना अंधार झाला तरी नां. निलंगेकरांनी शेतकर्‍यांच्या शिवारात जाऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा विश्वास दिला.
राज्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असुन खरीपाची पिके हातातुन गेलेली आहेत तर रब्बी पिकांची पेरणी होणेही अशक्य झालेले आहे. यामुळे शेतकर्‍यांसह व्यापारी व सर्वसामान्य जनता मोठ्या संकंटात सापडली आहे. या संकंटावर मात करुन शेतकर्‍यांना पुन्हा उभा करणे शासनाची जबाबदारी असुन याकरीता ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बीड जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधला. ना. निलंगेकरांनी धारुर येथील शिवाजी चौकात नागरीक व व्यापार्‍यांशी संवाद साधुन दुष्काळसदृश्य परिस्थिती मुळे व्यापार व जीवनमानावर काय परिणाम होत आहे, याबाबत माहिती घेतली. यानंतर वडवणी तालुक्यात असलेल्या ढोरवाडी येथील शंकर चव्हाण यांच्या शेतशिवारात जाऊन पावसाअभावी हातातून गेलेल्या कापसाच्या पिकाची पाहणी केली तसेच बीड तालुक्यातील पोखरी येथील सखाराम बिटे यांच्याही शेतातील कापसाच्या पिकाची पाहणी करुन जिल्हाधिकारी एम.डी. सिंग यांना या सर्व परिस्थितीचा अहवाल तात्काळ सादर करावा असे निर्देश दिले. यावेळी जिल्हाधिकारी सिंग यांनी या परिस्थितीमूळे शेतकर्‍यांना किती प्रमाणात नुकसान होईल याची माहिती देऊन तात्काळ सदर परिस्थितीचा अहवाल सादर करु असे सांगितले. तालुक्यातील घाटसावळी येथे ना. निलंगेकर यांनी शेतकरी व ग्रामस्थाची संवाद साधत या परीसरातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला. माजलगाव तालुक्यातील नित्रुड व पाथुर्डी येथील ज्ञानेश्वर जाधव व शेख अशरफ शेख महमद्द यांच्या शिवारात जाऊन कापुस व तुरीची पाहणी केली. पाथुर्डी येथीलच शेख चंाद यांच्या निवासस्थानी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी विजजोडणी तात्काळ करून द्यावी व विजबिल तात्काळ माफ करत टंचाई बाबतच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. ना. निलंंंगेकर यांनी केंद्र व राज्यातील शासन शेतकर्‍यांसह सर्वसामान्याच्या हितासाठी बांधील असल्याचे सांगून लवकरच टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. शेतकर्‍यांच्या हितासह प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजनांची अमलबजावणी यापुर्वी केलेली असल्याचे सांगुन या योजना त्यांच्यापर्यत पोहचविण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरगांई करु नये असे स्पष्ट निर्देश दिले. सध्या कठीण प्रसंग असुन या प्रसंगात शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असुन शेतकर्‍यांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत मागे राहणार नाही अशी ग्वाही दिली. या पिकपाहणी दौर्‍या दरम्यान विविध ठिकाणी शेतकर्‍यांसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा या आशयाचे निवेदन ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दिले.


Comments

Top