लातूर: लातूर तालुक्यातील वरवंटी व बसवंतपूर येथे माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या स्थानिक विकासनिधीतून व्हॉलीबॉल क्रीडांगण विकसीत करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती शितलताई फुटाणे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. गावपातळीवर व्हॉलीबॉल खेळास सध्या लोकप्रियता मिळाली आहे. युवक व ग्रामस्थांची ओढ या खेळाकडे वाढली आहे. वरवंटी व बसवंतपूर येथील युवकांनी व्हॉलीबॉल मैदान विकसिउत करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्याप्रमाणे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी स्थानिक विकासनिधीतून व्हॉलीबॉल क्रीडांगण विकसित करण्यासाठी दोन्ही गावांना प्रत्येकी रूपये एक लाखाचा निधी दिला आहे. वरंवटी व बसवंतपूर येथील कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ शितलताई फुटाणे, सरपंच सौ पंचशीला वाघमारे, तानाजी फुटाणे, आनंद पवार, दिलीप चिकटे, प्रशांत खोबरे, अनिता राठोड, दुष्यांत वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, दत्ता सरवदे, ग्रामसेवक सौ इरे, भोई, निरंजन माने, जाधव नेताजी, प्रवीण खोबरे वरंवटी येथे उपस्थित होते. तर बसवंतपुर येथे आकाश वाघमारे, समीर काझी, बालाजी सरवदे व इतर ग्रामस्थ व युवक, विद्यार्थी उपस्थित होते.
Comments