लातूर: सध्याची नैसर्गिक स्थिती बदललेली असून नापीक शेती व आर्थिक अडचणीमुळे तमाम शेतकरी वर्ग विवंचनेत सापडला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वेधशाळेने सन २०१८-१९ खरीप हंगामात चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता, तो पुर्ण चुकीचा ठरला. कमी पाऊस पडल्यामुळे लातूर जिल्ह्यासहीत संपुर्ण मराठवाड्यामध्ये भिषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सन १९७२ पेक्षा मोठा दुष्काळ असल्याचे शेतकरी व ग्रामीण भागातील जनता सांगत आहे, तरीही शासनाने उद्याप दुष्काळ जाहीर केला नाही, अथवा दुष्काळाच्या उपाय योजना केल्या नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्य व देश जलसंपत्ती प्राधिकरणाने उजनी धरणातून २३.६ टी.एम.सी.व सन १९७५ च्या आंध्रप्रदेश-महाराष्ट्र करारानूसार पौचपाड धरणातून पाणी गोदावरी, कृष्णा खोर्यातून मिळाले पाहिजे, अशा अत्यंत महत्त्वाचे व खालील प्रश्न त्वरीत शासनाने सोडवावे. सबंध लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेचा गांभिर्याने विचार करून शासनाने लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करावा, अशी मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या वतीने शिष्टमंडळासमवेत लोकनेते माजी शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून जननायक संघटना महाराष्ट्रच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी काँ. विठ्ठलराव मोरे, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कोरे, उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, एसआर मारे, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष नरसिंग इंगळे, चिटणीस राजाभाऊ मुळे, बब्रुवान पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, शेतकरी सुधाकर शिंदे, शिवराम बारेबोले, भरत जाजू, सुर्यकांत काळदाते, शिवराम कदम आदी उपस्थित होते.
Comments