HOME   लातूर न्यूज

जननायक संघटनेच्या पाठीशी उभे रहा- कव्हेकर

शेतमालाची बाजारात कमी भावाने विक्री होताना सरकार गप्प का?


जननायक संघटनेच्या पाठीशी उभे रहा- कव्हेकर

लातूर: खुल्या बाजारात शेती मालाची कमी दराने विक्री होत असताना सरकार गप्प का असा सवाल उपस्थित करुन या सरकारला वठणीवर आणण्यासाठी तमाम शेतकर्‍यांनी जननायक संघटनेच्या पाठीमागे ताकद उभी करावी असे आवहान जननायक संघटनेचे प्रणेते, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी रेणापूर तालूक्यातील घनसरगाव, कामखेडा, वाला, खलंग्री, आसरावाडी, दिवेगाव येथील आयोजित जनसंवाद यात्रा बैठकीच्या प्रसंगी बोलताना केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, एमएनएस बँकेचे व्हाईस चेअरमन एसआर मोरे, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे, आप्पासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ.वनिता काळे, सौ. केशरबाई महापुरे, खलंग्री बैठकी प्रसंगी दिलीप बोकडे, तंटामुक्‍त अध्यक्ष, बलभीम खैरमोडे, माजी सरपंच बळराम गोरे, पोलीस पाटील गंगाधर माने, उपसरपंच गजानन बोळंगे, रामभाऊ गवारे, आसराची वाडी येथिल बैठकीसाठी पोलीस पाटील बाबूराव नागरगोजे, माजी सरपंच उत्‍तम नागरगोजे, सरपंच गोविंद नागरगोजे, तसेच दिवेगाव येथे सरपंच भागवत कांदे, श्रीराम कांदे, तंटामुक्‍त अध्यक्ष संजय कांदे, उपसरपंच मनोहर लटपटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार कव्हेकर म्हणाले की राज्य सरकार हे कर्जमाफीचे राजकारण करीत असून ३४००० कोटींची कर्ज माफी जाहिर केली. मात्र चुकीच्या व जाचक ऑनलाईन प्रणालीमुळे प्रत्यक्षात केवळ ५८४ शेतकर्‍यांनाच त्याचा लाभ झाला असून आम्हाला सरसकट कर्ज माफी हवी आहे. गेल्या दोन वर्षातील भीषण दुष्काळामधील जादा लाईट बील माफ करावे, उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. तरुण शेतकर्‍यांना आर्थिक निकषावर शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, आदी मागण्या करुन सरकार कोणाचेही असो आपण सर्व सामान्यांच्या, शेतकरी गोरगरिबांच्या हितासाठी ग्रामीण भागातील जनतेच्या विकास प्रश्‍नासाठी लढत राहू, तुम्ही हाक मारा आपण जनतेच्या सूख दुखात व अडीअडचणीला धावून येऊ असा दिलासा या गावातील आयोजित बैठकीत जनतेशी बोलताना दिला.


Comments

Top