लातूर: शासनाने ऑक्टोबर, २०१८ मध्ये लातूर जिल्ह्यासाठी साखर शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी ०२ हजार ६३८ क्विंटल साखरेचा कोटा मंजूर केलेला आहे. हे ०२ हजार ६३८ क्विंटल साखरेचे नियतन माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये साखरेची शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी दर प्रतिव्यक्ती ०१ किलो या परिमाणानुसार नियंत्रित परिमाणात वाटप करण्यासाठी साखरेचे नियतन दिलेले आहे. या परिमाणानुसार तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना प्रति किलो रुपये २० रुपये या किरकोळ दराने रास्त भाव दुकानदारामार्फत साखर उपलब्ध होणार आहे. साखर कार्डधारकांना शासनाने ठरवून दिलेल्या परिमाणांत वाटप करण्यात येणार आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर यांनी कळविले आहे.
Comments