लातूर: मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने देशात ‘मुस्लिम समाजाची आजची स्थिती व भविष्यातील वेध’ या विषयावर लातूर येथील टाऊन हॉलच्या मैदानावर २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०५ वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना राबेअ हसन नदवी, प्रवक्ता मौलाना सज्जाद नौमानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती मौलाना इस्त्राईल रशिदी यांनी दिली. देशात मुस्लिम समाजाची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती या विषयावर या सभेत चिंतन केले जाणार आहे. यावेळी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव हजरत मोहम्मद उमरैन रहेमानी, मौलाना जुनैद आझाद कासमी, मौलाना महेङ्गुजरहेमान हे सामाजिक स्थितीचा आढावा मांडणार आहेत. तर संपूर्ण मराठवाड्यातील धर्म गुरु, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. समाजबांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर जिल्हा इस्लाहे मुआशरा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments