HOME   लातूर न्यूज

सरकारने लातुरच्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले

जिल्हाच दुष्काळी जाहीर करायला हवा होता- शिवाजीराव पाटील कव्हेकर


सरकारने लातुरच्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले

लातूर: शासनाने दुष्काळग्रस्त पध्दत व चुकीचे निकष तसेच २०१६ च्या मुल्यांकनाच्या आधारे राज्यातील १५१ तालुक्याचा दुष्काळ यादीत प्राधान्याने समावेश केला आहे. केवळ ११२ तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले असून त्यात लातूर जिल्ह्यातील नऊ तालुके वगळून भयानक नैसर्गिक कोप व नापीक शेती या आर्थिक अडचणीत तसेच विवंचनेत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या भावनेचा विचार न करता त्यांच्या जखमेवर मीठ शासनाने चोळले असल्याचा आरोप करून शेतकरी बांधवाच्या प्रती संवेदना व्यक्‍त करून या निर्णयाचा शासनाने त्वरीत पुनर्विचार करून दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जननायक संघटनेच्या वतीने जनसंवाद यात्रेनिमित्त लातूर तालुक्यातील रामेगाव येथे आयोजित शेतकरी बांधवाच्या बैठकीत बोलताना केले.
जननायक संघटनेचे उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, बाबासाहेब देशमुख, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष नरसिंग इंगळे, चिटणीस राजाभाऊ मुळे, बब्रुवान पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राजेसाहेब देशमुख, तसेच रामेगावचे काकासाहेब मगर, उपसरपंच श्रीहरी मगे, माजी सरपंच वसंतराव मगर,सुनिल बिडवे, बालासाहेब बिडवे, अविनाश मगर, काकासाहेब आदमाने, अविनाश मगर, भारत मगे, अविनाश मगे, बलभिम मगर, पंडीतराव मगर, आदीसंह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.


Comments

Top