लातूर: निसर्गाची अवकृपा व शासनाची उदासीनता यामूळे लातूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत असून शेतकरी व सामान्य माणूस यामुळे अडचणीत सापडला आहे. अशा वेळी संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने युवा नेते जिल्ह परिषद सदस्य धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शननुसार निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. अशावेळी कर्तव्य भावनेतून शासनाने उपाययोजना करत विद्यार्थ्यांची फिस माफी, शेकर्यांची वीज बील माफी, हेक्टरी आर्थिक मदत व दुष्काळाच्या काळातील जनतेसाठी नियमांप्रमाणे ज्या काही योजना राबवण्याच्या तरतुदी आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून जनतेला दिलासा द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रदिप राठोड, श्रीनिवास शेळके, डॉ. दिनेश नवगिरे, अॅड व्यंकट पिसाळ, राजेसाहेब सवाई, रत्नाकर केंद्रे, बाळकृष्ण माने, निखीलेश पाटील, असगर पटेल, तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव पुनीत पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रविण घोटाळे, लातूर जिल्हा युवक काँग्रेस चे सरचिटणीस बाबा पठाण, अमित जाधव, प्रमोद कापसे, महेश शिंदे, युवक काँग्रेस चे कार्यकर्ते कुणाल श्रृंगारे, जाफर नाना, जयदेव मोहिते, कुणाल वागज, अजय वागदरे, सोमेन वाघमारे, सय्यद मुस्ताकिर ,करण कांबळे , जय ढगे, जाफर सय्यद, योगेश शिंदे, प्रा.प्रविण कांबळे, सचिन इगे, प्रदीप काळे, विश्वनाथ कागले, यशपाल कांबळे, राहूल डुमने, सागर मुसंडे, महेश इंगळे इत्यादी अनेक युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Comments