अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर: पुण्यातील प्रसिद्ध टी ब्रँड कडक स्पेशलचा लातूर शाखेचा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दयानंद महाविद्यालयाच्या समोर खाडगाव मार्गावर हे कॅंटीन सुरु झाले आहे. यावेळी बाजार समिती सभापती ललित भाई शहा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, भाई नगराळे, लातूर शहर अध्यक्ष मोईज शेख, समद पटेल, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, लालासाहेब चव्हाण, सुदाम रूखमे, नागसेन कामेगावकर, व्यंकटेश पुरी, नगरसेवक आयुब मणियार आदी उपस्थित होते. देशभरातील विविध चहाचे प्रकार आणि त्यातून अभ्यास करून कडक स्पेशल टी हाऊस ची निर्मिती केली. याबद्दल ब्रँडचे प्रमुख अजित केरुरे यांचे कौतूक केले. टी हाऊस प्रमुख. सुहासराव काळे, मदन भिसे, सचिन काळे, वैभव काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments