HOME   लातूर न्यूज

इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढू लागली

लातुरात नामांकित कंपनीच्या दुचाकी आणि तिचाकी वाहन दालनाचे उदघाटन


इलेक्ट्रीक वाहनांची मागणी वाढू लागली

लातूर: इंधनाचे भाव जसजसे वाढू लागले आहे तसतशी विजेवर चालणार्‍या दुचाकी आणि तिचाकी वाहनांचीही मागणी वाढू लागली. अशी चार पाच कंपन्यांची शोरुम लातुरात आहेत. त्यात श्रीशैल नामक लोहिया कंपनींची वाहने विकणार्‍या एजन्सीचा शुभारंभ करण्यात आला. लातूर शहरातील बार्शी रोडवरील प्रदूषण व इंधन विरहित ईलेक्ट्रिक वाहनांच्या श्रीशैल शोरुमचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. हे शोरुम एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर रुजू झाले आहे.लातुरात नामांकित कंपनीच्या दुचाकी आणि तिचाकी वाहन दालनाचे उदघाटन
लातूर: इंधनाचे भाव जसजसे वाढू लागले आहे तसतशी विजेवर चालणार्‍या दुचाकी आणि तिचाकी वाहनांचीही मागणी वाढू लागली. अशी चार पाच कंपन्यांची शोरुम लातुरात आहेत. त्यात श्रीशैल नामक लोहिया कंपनींची वाहने विकणार्‍या एजन्सीचा शुभारंभ करण्यात आला. लातूर शहरातील बार्शी रोडवरील प्रदूषण व इंधन विरहित ईलेक्ट्रिक वाहनांच्या श्रीशैल शोरुमचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. हे शोरुम एमआयडीसी पोलिस ठाण्यासमोर रुजू झाले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण को- ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन उमेश कुलकर्णी, लोहिया ऑटो चे रिजनल मॅनेजर विक्रम रेड्डी, बाजार समिती सभापती ललितभाई शहा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, भाई नगराळे, अध्यक्ष मोईज शेख, समद पटेल, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, पुनीत पाटील, व्यंकटेश पुरी आदी उपस्थित होते.
वाढत्या इंधन टंचाईच्या काळात प्रदूषण रोखणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. काळाची गरज ओळखून तशी वाहने आता बाजारात येत आहेत. श्रीशैल शोरुमच्या माध्यमातून ही वाहने लातूरकरांना उपलब्ध होत आहेत ही आनंदाची बाब सल्याचे आमदार अमित देशमुख म्हणाले. यावेळी श्रीशैल शोरुमचे सिद्राम बनाळे, अमोल बनाळे, सृजन बनाळे, शैलजा बनाळे, अमोल बनाळे, वंदना बनाळे, आदी उपस्थित होते.
संपर्क: अमोल बनाळे ८८८८८४५३६६


Comments

Top