HOME   लातूर न्यूज

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा

आनंद द्वीगुणित करा- सौ. आदिती अमित देशमुख


पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा

लातूर: दिवाळीचा सण आपल्या संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा सण आहे. सर्व स्नेही, कुटुंबिय एकत्र येवून तो आपण साजरा करीत असतो. इतरांच्या मनामध्ये उत्साह आणि आनंद निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश असतो. पर्यावरणपूरक दिपोत्सव साजरा केल्याने तो उद्देश सफल होतो, असे प्रतिपादन ट्वेंन्टीवन ॲग्रोच्या संचालिका आदिती अमित देशमुख यांनी केले. लातूर येथील जगदंबा देवस्थान व सुमन संस्कार प्रेम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक वास्तू असलेल्या गंजगोलाई येथे दिपावलीच्या निमित्ताने आयोजित २१०० दिव्यांच्या दिपोत्सवाचे उद्घाटन सौ. आदिती देशमुख यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. दिवाळीचा सण सर्वांनी आनंदाच्या, उत्सवाच्या वातावरणात साजरा करावा, यानिमित्ताने कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. हा उत्सव पर्यावरण पूरकच ठरावा असेही त्यांनी म्हटले.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, देवस्थान कमिटीचे मन्मथअप्पा पंचाक्षरी, सुमन संस्कार स्कूलचे सचिन मालू, अर्चना मालू, संगिता मोळवणे, बसवंतअप्पा भरडे, ॲड. गंगाधर हमणे, तुकाराम साठे, मन्मथ शिवप्पा पारशेट्टी, डॉ.अरविंद भातांब्रे, प्रा.ओमप्रकाश झुरुळे, बालाजी पिंपळे, महेश बिडवे इतर सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, लहान मुले व असंख्य महिला उपस्थित होत्या.


Comments

Top