HOME   लातूर न्यूज

कव्हेकर १२ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करणार

ग्रामीण भागातील दौर्‍यात कष्टकरी, शेतकर्‍यांच्या सोडवण्याची मागणी


कव्हेकर १२ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करणार

लातूर: सध्याची ग्रामीण भागात उद्भवलेली नैसर्गिक परिस्थिती, नापीक शेती व त्यात आर्थिक अडचणीत, विवंचनेत सापडलेला शेतकरी, कष्टकरी तसेच तमाम ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व त्यांची प्रश्‍न, समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब हे २६ ऑक्टोबर २०१८ ते ०३ नोव्हेबर २०१८ या कालावधील लातूर तालुक्यातील ५४ गावचा दौरा करून जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या राज्य, जिल्हा व स्थानिक पातळीवर प्रयत्न करीत आहोत. लातूर जिल्ह्यातील या भिषन परिस्थितीचा विचार करून शासनाने त्वरीत टंचाई जाहीर करावी. व इतर कांही मागण्यासांठी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता गांधी चौक येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.


Comments

Top