लातूर: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने लातूर लोकसभा मतदार संघातील लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छूक उमेदवारांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
ही नोंदणी प्रक्रिया १० नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सकाळी ११ ते ०५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. इच्छूक उमेदवारांनी आपल्या वैयक्तीक माहितीसह काँग्रेस भवन लातूर येथे आपली नोंदणी करावी असे अवाहन लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे तसेच लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख यांनी केले आहे.
Comments