लातूर: शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर करताना चुकीची पध्दत व चुकीचे निकष तसेच २०१६ च्या मुल्यांकणाच्या आधारे राज्यातील १८० तालुके दुष्काळ सदृश्य म्हणून जाहीर केले. त्यात १५१ तालुक्याचा दुष्काळ यादीत प्राधान्याने समावेश केला आहे. तसेच केवळ ११२ तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळग्रस्त तालुके म्हणून जाहीर केले असून त्यात लातूर जिल्ह्यातील नऊ तालुके वगळून भयानक नैसर्गिक कोप व नापीक शेती या आर्थिक अडचणीत तसेच विवंचनेत सापडलेल्या शेतकर्यांच्या भावनेचा विचार न करता त्यांच्या जखमेवर मीठ शासनाने चोळले आहे असा आरोप माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांनी केला आहे. शेतकरी बांधवाच्या प्रती संवेदना व्यक्त करून या निर्णयाचा शासनाने त्वरीत पुनर्विचार करून दुष्काळ जाहीर करावा, असे प्रतिपादन जननायक संघटनेच्या सवांद यात्रेनिमित्त लातूर तालुक्यातील काटगाव येथे आयोजित शेतकरी बांधवाच्या बैठकीत बोलताना केले.
जननायक संघटनेचे उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, बाबासाहेब देशमुख, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष नरसिंग इंगळे, चिटणीस राजाभाऊ मुळे, बब्रुवान पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, सरपंच गोविंद माळी, चेअरमन कृष्णकांत बोराडे, माधवराव बोराडे, श्रीकृष्ण बोराडे, सत्यनारायण बोराडे, आप्पासाहेब पाटील, दादासाहेब पाटील, हरिश्चंद्र बोराडे, शिवराज हालकुडे, प्रल्हाद बोराडे,दिनकरराव पाटील आदीसंह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
Comments