HOME   लातूर न्यूज

कबड्डी स्पर्धेत गुजरातच्या मुलींचा दबदबा

आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा दयानंदच्या मैदानावर


कबड्डी स्पर्धेत गुजरातच्या मुलींचा दबदबा

लातूर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पश्‍चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (मुली) स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळच्या सत्रात झालेलल्या सहा सामन्यात हेमचंद्र आचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ पाटण व वीर नर्मदा विद्यापीठ सूरत यांनी चमकदार कामगिरी केली.
सकाळच्या सत्रात पहिला सामना कडी सर्व विद्यापीठ गुजरात विरूद्ध गुजरात विद्यापीठ सादरा यांच्यात झाला. यात गुजरात विद्यापीठ सादराने ५५-२९ अशा गुणांनी विजय मिळविला. दुसरा सामना बनस्थली विद्यापीठ विरूद्ध सौराष्ट्र विद्यापीठ राजकोट यांच्यात खेळण्यात आला. यात सौराष्ट्र विद्यापीठाने ४६-४० अशा गुणङ्गरकांने विजय संपादन केला. तिसर्‍या सामन्यात जळगावच्या कवयत्रि बहिणबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठातून ५५-३५ अशा गुण ङ्गरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्या सामन्यात ग्वालेरच्या एल. एन. आय. पी. विद्यापीठाने गांधी नगरच्या स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठाच्या संघावर ५३-२४ असा दणदणीत विजय मिळवला. पाचव्या सामन्यात हेमचंद्र आचार्य उत्तर गुजरात विद्यापीठाने अहमदाबादच्या रक्षाशक्ती विद्यापीठावर ६४-२२ असा एकतर्फी विजय मिळविला. शेवटच्या सामन्यात सुरतच्या वीर नर्मदा विद्यापीठाने गुजरात विद्यापीठ वनरंगपुराला ५६- १८ अशा गुणांनी पराभूत केले.
या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेशातील संघ सहभागी झाले असून पंच म्हणून विक्रम पाटील, लक्ष्मण बेल्लाळे, धनंजय नागरगोजे, संग्राम मोहीते, सुबराव कांबळे, ब्रम्हानंद मेंगडे, सतीश उबाळे, बाळासाहेब पाटोळे, संतोष नागवे, प्रा. माधव शेजुळ, प्रा. नवनाथ भालेराव, योगेश जोशी, मेहराज खान पठाण आदिंनी काम पाहिले.


Comments

Top