HOME   लातूर न्यूज

लोदगा येथे सोमवारी पशू सर्वोपचार शिबीर

नव्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन, मंत्री जानकरही येणार


लोदगा येथे सोमवारी पशू सर्वोपचार शिबीर

लातूर: सोमवार १२ नोव्हेंबर रोजी लोदगा (ता. औसा ) येथे नूतन पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन होणार आहे. याच वेळी फिनिक्स फाऊंडेशन संस्था, ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पशू सर्वोपचार शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील कन्हेरी मठाचे काडसिद्धेश्‍वर स्वामी यांच्या हस्ते दवाखाना आणि शिबिराचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंर्वधन, दुग्ध विकास व मस्यविकास मंत्री महादेव जानकर तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, लातूर विभागाचे प्रादेशिक पशु संवर्धन सह आयुक्त एस.एन. सुर्यवंशी, परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, उदगीरचे पशु वैद्यक डॉ. अनिल भिकाणे, पुण्याचे पशुवैद्यक डॉ. सुरेश गंगावणे, लातूरचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एच.एन. सूर्यवंशी, जि.प.चे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. बी.यु. बोथनकर यांची उपस्थिती राहणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता जनता विद्यालय, लोदगा येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय, फिनिक्स फाऊंडेशन संस्था, विविध कार्यकारी सोसायटी आणि लोदगा ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.


Comments

Top