लातूर: नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात अत्यंत कमी पाऊस झाला. जलसाठा झाला नाही यापुढे असे होवू नये यासाठी जलयुक्त शिवार योजनेवर लक्ष केंद्रीत करून जमिनीवर पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीतच मुरविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी केले. दिपावलीचा सण नुकताच संपन्न झाला. यानिमित्त शुभेच्छांची देवाण - घेवाण अजूनही सुरू आहे. हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांचा औसा तालुका दौरा सुरू आहे. नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी हा दौरा सुरू असलेल्या या दौऱ्यात विविध ठिकाणी बोलताना पवार यानी हे मत मांडले .
शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस अभिमन्यू पवार यांनी औसा तालुक्याचा दौरा केला. या दोन्ही दिवसामध्ये त्यांनी त्यालुक्यातील विविध गावामध्ये पदाधिकारी व नागरिकांच्या भेटी - गाठी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला, दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. ग्राम पातळीवर नागरिकांना असणार्या अडचणी जाणून घेतल्या. या दौर्यात पवार यांनी आशिव येथे पंडीत काकडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. नामदेवराव माने यांच्या अॅग्रो प्रोड्युसरचे उद्घाटन केले. मातोळा येथील सोसायटीच्या मैदानावर कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्यासोबत शेती तसेच विविध समस्या याबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने संदर्भात नागरिकांनी मागणी केली. अभिमन्यू पवार यांच्याच प्रयत्नातून मातोळा सर्कलच्या विकासासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे काकासाहेब मोरे यांनी यावेळी सांगितले. औसा तालुक्यातील सिंदाळा, गुबाळ, मंगरूळ येथेही अभिमन्यू पवार यांनी कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. जेवरी (ता.निलंगा) येथे सुरू असणार्या पारायण सोहळ्यात उपस्थित राहून सरपंच संजय जेवरीकर यांच्यासह आरती केली. औसा शहरात उमर फारुख युवा मंचच्या नाम फलकाचे अनावरणही त्यांनी केले.
Comments