लातूर: श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या नूतन चेअरमनपदी चेअरमन गणपत बाजुळगे आणि व्हॉ.चेअरमनपदी शाम भोसले यांची निवड झाल्याबद्दल माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांची बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदारांनी त्यांचा सत्कार केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, उपाध्यक्ष प्रा. मोतीपवळे सर, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एसआर देशमुख, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, सचिन दाताळ उपस्थित होते.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार चेअरमन पदासाठी गणपत बाजुळगे तर व्हॉईस चेअरमन पदासाठी शाम भोसले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. संचालक मंडळाने बाभळगाव येथील विलासबाग येथे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी कारखान्याचे नूतन संचालक श्रीशैल्य उटगे, विलास पाटील, अनिल झिरमीरे, हरिश्चंद्र यादव, शामराव साळुंके, सचिन पाटील, शाम भोसले, गितेश शिंदे, हणमंत माळी, प्रदीप चव्हाण उपस्थित होते.
Comments