औसा: गेल्या पंचवीस वर्षापासून अखंडपणे चालू असलेल्या वैभवशाली सांस्कृतिक चळवळीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने औसेकरांनी आता, ‘आम्ही औसेकर’ या ब्रीदाखाली एकत्र येवून, २७ ते ३१ डिसेंबर २०१८ या दरम्यान भव्य-दिव्य स्वरुपात ‘डिसेंबर कला यात्रा महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. या कला यात्रा महोत्सवात एकूण दहा विचारमंथनाची सत्रे संपन्न होणार आहेत. त्यात विचार मंथनात पाच बौध्दीक सत्रे तर निखळ मनोरंजनाची पाच सांस्कृतिक सत्रे संपन्न होणार आहेत.
यासंदर्भात औसा शहर आणि तालुक्यातील विविध क्षेत्रातली मान्यवरांची एक व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीत यात्रेच्या आयोजनाची रुपरेषा, कार्यक्रम स्थळ आणि यात्रा यशस्वीतेसाठीचे संपूर्ण नियोजन करण्यात आले. डिसेंबर कला यात्रा महोत्सव समितीचे गठन एकमताने करण्यात आले व डिसेंबर कला यात्रा महोत्सव समिती जाहीर करण्यात आली.
यात्रा महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री तिपणप्पा राचट्टे यांची तर स्वागताध्यक्षपदी श्री पांडूरंग चेवले यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्री दत्तूअण्णा कोळपे, उपाध्यक्षपदी अनुक्रमे श्री दिगंबर माळी व प्रदीप मोरे यांची निवड करण्यात आली. तर प्रदेश समन्वयक संयोजकपदी ऍड, श्रीकांत सुर्यवंशी, डिसेंबर कला यात्रा महोत्सवाच्या महासचिवपदी ऍड. शाम कुलकर्णी यांची तर सचिवपदी शेख शकिल आणि राम कांबळे यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी श्री वैजीनाथ इळेकर तर सहकोषाध्यक्षपदी रामभाऊ जोगदंड, सुदाम खंडागळे यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी सर्वश्री अंगद कांबळे, शरद बनसोडे आणि वामन पाठक यांची निवड करण्यात आली.
डिसेंबर कला यात्रा महोत्सव समितीच्या मुख्य संयोजकपदी राजू पाटील यांची तर कार्यकारी संयोजकपदी हणमंतभैय्या राचट्टे यांची निवड करण्यात आली. संयोजकपदी सर्वश्री प्रा. विजयकुमार मिश्रा, राम शिंदे, तानाजी भावे तर सहाय्यक संयोजकपदी धमेंद्र बिसेनी, बिरबल देवकते, गोविंद खंडागळे यांची निवड करण्यात आली.
डिसेंबर कला यात्रा महोत्सव समितीच्या मुख्य सल्लागारपदी सुभाषप्पा मुक्ता, सुशिलदादा बाजपाई, मुक्तेश्वर वागदरे, सतिश नाईक, भगवानराव देशपांडे, विजयकुमार बोरफळे, मुज्जफरअली इनामदार, शिवलिंगप्पा औटी, प्रा.भिमाशंकर राचट्टे, संतोष सोमवंशी, विजयकुमार मिटकरी, शिवकुमार नागराळे, मुस्लीम कबीर, प्रशांत राठोड, सुरेशदादा भुरे, निवृत्ती कटके, विजय सुर्यवंशी, रमेश दुरुगकर, संजय सगरे, विजयकुमार कुंभार, सुधीर गंगणे, महेबूब बक्षी, बाळकृष्ण नाईक, वसंत महामुनी, अर्जुन ढगे, योगेश नाईक, सुनिल पाठक, गुंडानाथ सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली. यात्रा समन्वयकपदी रमाकांत माळी यांची निवड करण्यात आली.
कला यात्रा महोत्सव समितीच्या विधी सल्लागारपदी अरविंद कुलकर्णी, झुल्फीकार इनामदार, नरसिंह फत्तेपूरकर, जयराज जाधव, विजय अष्टुरे, उन्मेश साळुंके यांची निवड करण्यात आली. तर आरोग्य मार्गदर्शकपदी डॉ. जे.बी. तत्तापुरे, डॉ. रविंद्र करमुडी, डॉ. केदार आपटे, डॉ. राहूल हाबरे, डॉ. इम्रान पटेल यांची निवड करण्यात आली. डिसेंबर कला यात्रेच्या पाच दिवसापैकी प्रत्येक दिवसाचे प्रोजेक्ट चेअरमन निवडण्यात आले असून, संतोषअप्पा मुक्ता, काशीनाथ सगरे, महादेव खिचडे, गणेश पटणे आणि विरेंद्र पत्रिके यांची तर प्रकल्पाधिकारी पदी रेवणअप्पा भागुडे यांची निवड करण्यात आली.
डिसेंबर कला यात्रा महोत्सव समितीच्या मुख्य प्रतोदपदी दादा कोपरे यांची निवड करण्यात आली. डिसेंबर कला यात्रा महोत्सव समितीच्या तालुका समन्वयक संयोजकपदी सर्वश्री आत्माराम साळुंके औसा, दत्तकुमार स्वामी उदगीर, चंद्रशेखर भालेराव अहमदपूर, बालाजी वळसांगवीकर देवणी, बाबुराव देशमुख निलंगा, प्रणव माने रेणापूर, ओम स्वामी लातूर ग्रामीण आणि कौस्तूभ पाटील लातूर यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाधिकारी पदी सर्वश्री चांगदेव माळी, रोहीत हंचाटे, अशोक नाईकवाडे, नसीर कुरेशी, ऍड. फिरोज पठाण यांची निवड करण्यात आली. प्रिंन्ट, इलेक्ट्रॉनिक माध्यम सल्लागारपदी दत्ता व्हंताळे, जलील पठाण, दिपक क्षीरसागर, बालाजी उबाळे, रमेश लोंढे, अभिजीत परिहार, विनय पिंगळे, शमशूल काझी, गौरीशंकर औटी, किशोर जाधव, वामन अंकुश, विलास तपासे, गिरीधर जंगाले, अंकुश दुधनकर यांची निवड करण्यात आली. व्यासपीठ प्रमुखपदी बाळू कल्याणी, हणमंत चव्हाण, शेख नय्युम यांची निवड करण्यात आली. औसा येथे राचट्टे फार्म हाऊसवर झालेल्या पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष पांडूरंग चेवले यांनी या कार्यकारिणीची घोषणा केली. शेवटी राम कांबळे यांनी आभार मानले
Comments