लातूर: नैसर्गिक परिस्थिती व नापीकीमुळे आर्थिक विवंचनेत सापडून लातूर तालुक्यातील मळवटी येथील कै.तुकाराम घोडके यांनी आत्महत्या केल्याचे समजताच लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मळवटी ता.जि.लातूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास त्यांच्या निवासस्थानी भेट देवून या परिवारास १० हजार रूपयाचा धनादेश देवून आर्थिक मदत केली.
यावेळी माजी जि.प.सदस्य राजकुमार पाटील, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, जननायक संघटना तालुका कार्याध्यक्ष नरसिंग इंगळे, एम.एन.एस.बँकेचे उपकार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, एल.बी.पाटील, माजी सरपंच शिंदे, चिंतामनी कदम, विवेक कदम,सरपंच श्रीमती कलावती कदम, घोडके परिवारातील सदस्य वडील, मयताच्या पत्नी श्रीमती सुनिता घोडके, मुले आदी उपस्थित होते.
Comments