लातूर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (मुली) स्पर्धेत मुंबई विद्यापीठ मुंबई संघाने विजेतेपद तर सावित्रीबाई फुले संघाने उपविजेते पद पटकाविले. मुंबई विद्यापीठाच्या सायली जाधवला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा तर सोनाली हेळवी हिला सर्वोत्कृष्ट चढाईपटू आरती बोडके हिला सर्वोत्कृष्ट पकडीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आले. तृतीय स्थानी एस एन डी टी विद्यापीठ तर चतुर्थ स्थानी भारती विद्यापीठ, पुणे
हे संघ राहीला. हे चारही संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या वतीने माजी कबड्डीपटू कै. सतीशसिंह हजारी यांच्या स्मरणार्थ प्रथम आलेल्या संघास रु. ११००० व द्वितीय आलेल्या संघास रु. ५००० रोख व स्मृतीचिन्ह हे विशेष पारितोषिक देण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जौन, संस्थेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष अशीषजी बाजपाई, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विट्ठलसिंह परिहार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. च
दयानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कै.अशोक कोंढरे क्रीडा नगरीत १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (मुली) स्पर्धा खेळण्यात आल्या. उत्साही वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हसबे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू माधव शेजुळ, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, उपप्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नितेश स्वामी हे उपस्थित होते.
Comments