लातूर: एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर यांच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत बुधवार, १४ नोव्हेंबर रोजी रेणापुर तालुक्यातील भंडारवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या़ आरोग्य शिबिरात विविध आजाराच्या २२६ रुग्णांची तपासणी करुन मोफत उपचार करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी सरपंच भास्करराव दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. मधुबाला कांबळे, उप सरपंच सौ. जयश्री दहिफळे, रामराव पाटील, ग्रामसेवक प्रदिप हालकंचे, तंटामुक्ती उपाध्यक्ष संजय जाधव, माधव पांचाळ, डॉ. राजेश विरपक्षे, बालरोग तज्ज्ञ डॉ. रुपाली कांबळे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता गणेश कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या आरोग्य शिबीरात ऱ्हदयरोग, कर्करोग, मुत्रपिंड, मुत्राशयाचे आजार, पोटाचे विकार, नेत्ररोग, मेंदु व मज्जासंस्था विकार, स्त्रीयांचे विविध आजार, त्वचारोग, अस्थीव्यंग, कान-नाक-घसा आजार, बालरोग, फुप्फुसाचे आजार या विविध आजाराच्या २२६ रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन प्राथमीक उपचार करण्यात आले. तसेच दिर्घ आजाराच्या २८ रुग्णांना पुढील उपचारासाठी लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. सदरील आरोग्य शिबीरात डॉ. गौरव गायकवाड, डॉ. नेहा मिश्रा, डॉ. करिष्मा शेख, डॉ. अंजली कुरुप, डॉ. अर्चना मुसळे, डॉ. अर्चना जाधव, डॉ. तुषार मगर, डॉ. अक्षय कदम, डॉ. निरज शिंदे, डॉ. अपुर्वा, डॉ. सुप्रिया पतंगे, डॉ. पांडूरंग चंदनशिवे, परिचारक अशोक गुमतापुरे, फार्मासिस्ट एस. के. रासुरे, डी. व्ही. जोशी व प्रकाश घुगे, भागवत कराड यांनी सेवा बजावली. या आरोग्य शिबीराच्या यशस्वीतेसाठी भंडारवाडी येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Comments