लातूर-मुंबई: आगामी लोकसभा निवडणूकीसाठी लातूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी मोठा उत्साह दाखविण्यात आला. मातब्बर अशा ५२ इच्छूकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. या प्रचंड उत्साहामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा आजच विजय निश्चित झाला आहे. असा विश्वास अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्या सुचनेवरुन आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने मुंबईतील टिळक भवन येथे जिल्हानिहाय आढावा बैठका होत आहेत. आज लातूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना या मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती नोंदवून काँग्रेस नेत्यांना सुखद धक्का दिला. यामुळे जेष्ठ काँग्रेस नेत्यांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत.
लातूर राखीव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी उच्च शिक्षित आणि समाजाच्या विविध स्तरांमध्ये कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनी उत्सुकता दाखविली आहे. यामध्ये निवृत्त सनदी अधिकारी, वरिष्ठ शासकीय अधिकारी, वैद्यकीय व्यवसायिक, वकील, अभियंते, प्राचार्य, प्राध्यापक त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात महत्त्वाची पदे भूषविलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राहूलजी गांधी, प्रांताध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी निवडलेल्या उमेदवाराला आगामी लोकसभा निवडणूकीत लातूर लोकसभा मतदार संघातून सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या मतदार संघातून मोठ्या संख्येने इच्छूक असणाऱ्या उमेदवारांची जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे आणि लातूर शहर अध्यक्ष ॲड. मोईज शेख यांच्या मार्फत छाननी करुन अंतिम यादी पक्षश्रेष्ठींकडे सादर केली जाईल असेही यावेळी अमित देशमुख म्हणाले. विशेषत: युवकांनी दाखविलेल्या उत्साहामुळे आपण भारावून गेल्याचे आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव आणि राज्याचे सहप्रभारी आशिष दुवा, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष शरद रणपिसे, आमदार विश्वजीत कदम, आमदार बस्वराज पाटील, आमदार त्रयंबक भिसे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, पक्ष प्रवक्ते राजू वाघमारे, सचिन सावंत व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील-निलंगेकर, यांच्या उपस्थितीत लातूर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. माजी सनदी अधिकारी भाई नगराळे, आमदार धर्मराज सोनकवडे, सहकार विभागातील ज्येष्ठ निवृत्त अधिकारी रामराव सोनकांबळे, लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रा.शिवाजी जवळगेकर, लातूरचे माजी उपमहापौर कैलास कांबळे, डॉ. विजय अजनीकर, नेत्रतज्ञ शिवाजी काळगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, निवृत्त कार्यकारी अभियंता किशन सुर्यवंशी, उद्योजक शिवाजी गायकवाड, सेवा निवृत्त नायब तहसीलदार मधुकर कांबळे, संभाजीराव घोडके, श्रीधर गायकवाड, अशोकराव काळे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेसचे उपाध्यक्ष जयंत काथवटे, राजाराम सुरवसे, लातूर काँग्रेसचे सरचिटणीस अंगद वाघमारे, महिला प्रदेश सचिव उषा कांबळे, ॲड. बाबासाहेब गायकवाड, माजी ॲड. मंजुषा कसबे, जिल्हा काँग्रेस कमिटी सदस्य विलास जाधव, सरचिटणीस बालाजी कांबळे, ॲड. जांबुवंतराव सोनकवडे, प्रदेश सदस्य शिवाजी गायकवाड, संचालक पंडित कांबळे, दिपक कांबळे, विनोद खटके, अमर कोथिंबीरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, डॉ. माधव गादेकर, ॲड. अंगद गायकवाड, ब्रम्हानंद शिंदे, दत्ता मस्के, ॲड. अस्मिता काटे, रामराव गवळी, सुरेश बासोडे, बिभीषण सांगवीकर, शिवाजी कांबळे, रामकिशन सोनकांबळे, ॲड. खुशालराव सुर्यवंशी, शिवमुर्ती पवार, राजेसाहेब सवई, फकीरा जोगदंड, संजय ओहळ, सुरेश त्रिमुखे, अशोक देडे, मच्छिंद्र कामत, सुदर्शन मसुर, अशोक साबळे, ॲड. दिग्वीजय काथवटे, हेमंत गायकवाड या इच्छुक उमेदवारांचा यात समावेश आहे.
Comments