HOME   लातूर न्यूज

लातूर येथे सीएम चषक स्पर्धेसाठी आढावा बैठक

३० ऑक्टोबर २०१८ ते २३ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित


लातूर येथे सीएम चषक स्पर्धेसाठी आढावा बैठक

लातूर : लातूर येथे सीएम चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत विशेष आढावा बैठकीचे शुक्रवार, दि. १६ नोव्हेंबर २०१८ रोजी आयोजन करण्यात आले. या बैठकीसाठी पालकमंत्री ना. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपायुवा मोर्चाचे प्रदेश प्रभारी संजयजी कौडगे, सीएम चषक स्पर्धेच्या मराठवाडा सहसंयोजक तथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर हे महाराष्ट्रासह देशात शिक्षण पंढरी म्हणून परिचीत आहे. यामुळे येथे अनेक भागांतून विद्यार्थी शिक्षणासाठी स्थित आहेत. या विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने शिक्षणा बरोबरच माणसिक आणि शारिरीक स्वास्थ लाभावे यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून सकल महाराष्ट्रात आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धेचे विशेष आयोजन लातूर येथे व्हावे आणि या स्पर्धांच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना खिलाडूवृत्ती बरोबरच अध्ययनात उत्तम दर्जा प्राप्त करण्यासाठी माणसिक आणि शारिरीक स्वास्थ लाभावे यासाठी सीएम चषक क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांकडून विशेष लक्ष वेधले जात आहे. त्यासंदर्भातील आयोजन व नियोजनासाठीच लातूर येथे या विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सीएम चषक स्पर्धेच्या माध्यमातून लातूर येथील विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबर २०१८ ते २३ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये जवळपास ४ कला प्रकारांच्या व ८ क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविता येणार आहे. अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांच्या माध्यमातून लातूरसह परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन अधिका अधिक प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. या बैठकीसाठी लातूर येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या अनेक कार्यकर्त्यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top