HOME   लातूर न्यूज

स्टेरिंग कमिटीच्या माध्यमातून विकासाबाबत समन्वय साधावा

लातुरच्या बैठकीत आ. अमित देशमुख यांचे आवाहन


स्टेरिंग कमिटीच्या माध्यमातून विकासाबाबत समन्वय साधावा

लातूर प्रतिनिधी: लातूर शहरांमध्ये विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक करून लातूर शहराच्या समस्या निराकरण करण्यासाठी स्टेरिंग कमिटीच्या माध्यमातून विकासाबाबत समन्वय साधावा असे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले आहे. लातूर शहरात स्टेरिंग कमिटीच्या वतीने आयोजित बैठकीत आमदार अमित देशमुख मार्गदर्शन करत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे शहर जिल्हाध्यक्ष मोइज शेख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, माजी नगराध्यक्ष एस. आर. देशमुख, लक्ष्मण कांबळे, माजी महापौर स्मिता खानापुरे, प्रा.शिवाजी जवळेकर आदी उपस्थित होते. आमदार अमित विलासराव देशमुख बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले की, सामाजिक प्रश्नांबाबत सर्वांनी एकत्र येऊन गटतट बाजूला सारून विचारविनिमय करावा, लातूर शहरातील समस्या बाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारावा. याआधीच्या काळात लातूर मनपात काँग्रेस सत्तेवर असताना विविध विकासाच्या योजना राबविल्या  त्या योजनात नावे, ठिकाणी आणि थोडासा बदल करून स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत तो आपण हाणून पाडावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सदयाचे सत्ताधारी मंडळी प्रभागाच्या विकास निधी वाटपात दुजाभाव करीत आहेत. भेदभाव न करतस समान निधीचे वाटप करीत नाहीत वेळ आलीच तर याबाबत न्यायालयाचा आधार घेतला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी बैठकीत माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळा कॉंग्रेस सत्तेत असताना मंजूर झाला होता मात्र भाजप सत्तेत आल्यानंतर या पुतळ्याबद्दल याबाबत कोणतीही कारवाई सत्ताधारी मंडळी करत नाहीत, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे एक कोटीचा विकास निधी मंजूर झाला होता तो निधी इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. शहर जिल्हाध्यक्ष मोईज  शेख यांनी लातूर शहरातील वैद्यकीय महाविद्यालयास लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव द्यावे अशा मागणीचे प्रस्तावावर कारवाई करावी अशी मागणी बैठकीत बोलताना केली. या बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, माजी स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, ॲड.व्यंकट बेद्रे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस मनपा विरोधी पक्षनेते दीपक सूळ, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, नगरसेवक रविशंकर जाधव, नगरसेविका सपना किसवे यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top