HOME   लातूर न्यूज

ऑनलाईन बांधकाम परवाना सेवा सुरळीत करा

इंजि. असोसिएशनची मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी


ऑनलाईन बांधकाम परवाना सेवा सुरळीत करा

लातूर: शहर महानगरपालिका लातूरच्या वतीने ऑनलाईन बांधकाम प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील त्रुटी कमी करून संपूर्ण सेवा सुरळीत चालू करावी अशी मागणी असोशिएशन ऑफ कनसलटिंग इंजिनिअर्स अँड आर्किटेक्टस लातूर च्या वतीने महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर शहर महानगर पालिकेने शहरातील नागरिकांसाठी बांधकाम परवाना ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे, याचे आम्ही इंजिनियर म्हणून स्वागत आहे. ज्यावेळी एखाद्या नागरिकाने परवान्यांसाठी अर्ज सादर केला तो वेळेत मिळण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत. या प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याने मालमत्ताधारक संबधित इंजिनिअर, आर्किटेक्ट हे मुदतीत काम करू शकत नाहीत. याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार वेळेत सेवा देण्यासाठी मनपा प्रशासनाने ऑनलाईन बांधकाम परवाना प्रक्रिया सुरळीत करावी अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना दिले आहे. यावेळी असोचे अध्यक्ष अभिजीत सरसंबेकर, उपाध्यक्ष धर्मवीर भारती, विनोद उदगीरकर, अरिहंत जंगमे, रितेश अवस्थी, अमोल सेलूकर, अनिल माने, सचिन हिस्वनकर, संदीप उच्चेकर, इंजि. भुते, नितीन मंडाळे, नितीन शेटे, अब्दुल बाशीद, शाम संगमकर यांच्यासह असोशियशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
असो.च्या या निवेदनाची दखल घेवून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सतिश शिवणे यांनी सदर ऑनलाईन प्रक्रियेबाबत कार्यशाळा घेवून यातील त्रुटी कमी करण्याचे आश्वासन दिले.


Comments

Top