लातूर: लातूर तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस देखील पडला नाही त्यामूळे संपूर्ण जिल्हात दुष्काळ पडला आहे. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करणे आवश्यक आहे. या करीता तातडीने दुष्काळ जाहीर करावा. सर्व पिके वाळून गेली आहेत. विविध गावात ऊस जळून गेला आहे, या सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दयावी असे निवेदन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांच्या मार्फत शासनाकडे लातूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देताना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडीले, व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, गोविंद बोराडे, उपसभापती दत्तात्रय शिंदे, जिप सदस्य परमेश्वर वाघमारे, संचालक रामचंद्र सुडे, नितीन पाटील, चंद्रकांत टेकाळे, रविद्र काळे, शाहूराज पवार, बंकट कदम, भारत आदमाने, युवराज जाधव, अनंत बारबोले, नरसिंग बुलबुले, जगदिश चोरमले, रावसाहेब मुळे, दौलत कदम, वसंत ऊफाडे, सहदेव मस्के, रघुनाथ शिंदे, भैरवनाथ सवाशे, मुरलीधर निकम, अरुण कापरे, सुभाष घोडके, जितेंद्र स्वामी, सदाशिव कदम, अनिल दरकसे, विजय चव्हाण, गोवर्धन मोरे, संजय चव्हाण, डॉ.सतिश कानडे, प्रताप पाटील, सचिन दाताळ, तात्यासाहेब देशमुख, जयदेव मोहिते आदी उपस्थित होते.
Comments