HOME   लातूर न्यूज

मनपाने वसुलीसाठी केले विशेष कॅंपचे आयोजन

सवलतीचा फायदा घेण्याचे आवाहन


मनपाने वसुलीसाठी केले विशेष कॅंपचे आयोजन

लातूर: लातूर शहर महानगरपालिका तर्फे मालमत्ता कर, पाणी पट्टी वसुली कॅम्पचे शहरात ठिकठिकाणी 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान कॅम्प आयोजित केले आहेत. शहरातील जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सुविधांचा लाभ घेत आपल्या मालमत्ता कर व पाणी पट्टीचा भरणा या वसुली कॅम्पमध्ये करत आहेत, या कॅम्पसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, तरी थकबाकीदारांनी आपल्या कराचा भरणा करावा तसेच ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत एकरकमी मालमत्ता कर भरणा केला तर व्याज अथवा दंडात ७५ टक्के सूट देण्यात आली आहे, या संधीचा सर्व थकबाकीदारानी लाभ घ्यावा. लातूर शहर महानगरपलिके मार्फत खालील दर्शीवलेल्‍या ठिकिाणी वसुली कॅम्‍पचे आयोजन केले आहे. लातूर शहर मनपाने १२ नोहेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यत संपुर्ण कराचा एक रकमी भरणा करणार्‍या मालमत्‍ताधारकास शास्‍ती (व्‍याज) मध्‍ये ७५ टक्के सूट देण्‍यात येणार आहे. शहरातील मालमत्‍ताधारकानी या सवलतीचा लाभ घेवून आपल्‍याकडील कराचा भरणा करावा असे आवाहन लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
थकबाकी वसुलीसाठी दयानंद कॉलेज, पीव्‍हीआर चौक, दत्‍त मंदिर प्रकाश नगर, गणेश मंदीर, कॉकसीट कॉलेज समोर बेळंबे कॉप्‍लेक्‍स समोर, केशवराज हायस्‍कुल, आर्दश कॉलनी कम्‍यूनिटी हॉल, विशाल शाळा एलआयसी कॉलनी, मधुमिरा मंगल कार्यालय, दत्‍त मंदीर, महानगरपालिका शाळा क्रमांक ०९, बसवेश्‍वर चौक, गंजगोलाई वल्‍लाकटे क्‍लॉथच्‍या समोर,
विवेकानंद चौक पोलीस चौकी शेजारी, महानगरपालिका शाळा क्रमांक ०९ मजगे नगर, शाहू चौक पुतळा शेजारी, मनपा शाळा क्रमांक ०६ खोरी गल्ली, बसवेशवर कॉलेज, येणगुरे शाळा खडक हनुमान लातूर.


Comments

Top