HOME   लातूर न्यूज

मालमत्ताधारकांनी कर भरणा करू नये- व्ही मित्र मंडळ

कराचे प्रकरण न्यायप्रविष्ट, निकालापर्यंत प्रतिक्षा करावी!


मालमत्ताधारकांनी कर भरणा करू नये- व्ही मित्र मंडळ

लातूर: लातूर महानगरपालिकेकडून बेकायदेशीर, नियमबाह्य व प्रचंड अशी मालमत्ता कर आकारणी केली जात आहे. त्याच आधारे पाणीपट्टी व इतर करांमध्ये सुद्धा प्रचंड वाढ केली आहे म्हणून सन २०१७ मध्ये व्ही मित्र मंडळाच्या वतीने महानगरपालिकेने बेकायदेशीर व प्रचंड करवाढ माघारी घ्यावी व नियमानुसार कर आकारणी करावी म्हणून धरणे आंदोलन केले होते.
या आंदोलनात महापौर, उपमहापौर यांनी सर्व साधारण सभा घेऊन वाढीव कर कमी करू असे आश्वासन दिले होते पण त्याची पूर्तता झाली नाही म्हणून व्ही मित्र मंडळाच्या वतीने संयोजक नात्याने अँड व्यंकट बेंद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल केली आहे. त्याद्वारे महानगरपालिकेची कर आकारणी पद्धतच रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकेत अनेक कायदेशीर तरतुदीचा अंतर्भाव अँड बेद्रे यांनी केलेला आहे. ज्यांची पूर्तता लातुर मनपाने केलेली नाही याचं धरतीवर मनपा सदस्य प्रकाश पाठक यांनीही मनपाच्या बेकायदेशीर व वाढीव मालमत्ता करा बाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिकेची सुनावणी एकत्रीत करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली व दोन्ही ही आव्हान याचिका पुढील सुनावणीसाठी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत.
असे असताना मनपा प्रशासन मालमत्ता कर भरण्या संबधी मालमत्ता धारकांची दिशाभूल करून दंडात व व्याजात सूट देतो असे प्रलोभन दाखवून मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद आहे अशा खोट्या आशयाच्या बातम्या प्रसिद्ध करीत आहेत.
वास्तविक लातुर शहरातील हजारो मालमत्ता धारकांनी लातुर येथील दिवाणी न्यायालयात करवाढी विरोधात अपिले दाखल केलेली आहेत. त्यामध्ये मनपाच्या वतीने उत्तर सादर करीत नाहीत व दुसरीकडे बेकायदेशीर करवाढ करण्याची घाई करीत आहेत. २० नोव्हेंबर रोजी लातूरमधील ७० पैकी ३५ नगरसेवकांनी मालमत्ता कर वाढ कमी करण्यासंदर्भात विशेष सर्व साधारण सभा बोलावण्याची मागणी केली आहे. याचीही दखल जनतेनी घ्यावी. उच्च न्यायालय व लातूर दिवाणी न्यायालयातील निर्णय होईपर्यंत कोणीही मालमत्ता व पाणीपट्टी कर भरून स्वतः हाचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये असे आवाहन अँड व्यंकट बेंद्रे, वैजनाथ शिंदे, अजीम शेख, डॉ बालाजी साळुंखे, महादेव मुळे, लक्ष्मीकांत मुळे, केशव कांबळे, वाल्मिक माढे, विश्वास कुलकर्णी, अँड प्रदीपसिंह गंगणे, अँड.दिनेश रायकोडे, ताहेर सौदागर, अजीज बागवान, जमालोदिन मणियार आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


Comments

Top