HOME   लातूर न्यूज

भीषण दुष्काळात जनतेचे प्रश्‍न तातडीने सोडवावेत

शिवाजी पाटील कव्हेकरांची तहसीलदारांसोबत बैठक


भीषण दुष्काळात जनतेचे प्रश्‍न तातडीने सोडवावेत

लातूर: लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत अल्प पावसामुळे शेतीमधील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावराचा चारा, शेतकर्‍यांची आर्थिक अडचण, पिण्याच्या पाण्याचा व मजुरांच्या कामाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक गावात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी उटी, धानोरी या गावातील शेतकर्‍यांच्या विहीरीवरील विद्युत कनेक्शन तोडले आहे. ते भोयरा गावाप्रमाणे परत जोडून द्यावे. नवीन कार्डधारकांना धान्य द्यावे. धान्याची अडचण असल्यास राज्य शासनाकडे वाढीव मागणी करावी, तो मंजूर करण्यासाठी सबंधित मंत्री महोदयाकडे प्रयत्न करू. नएक ठिकाणी शासकीय जमिनीवर राहणार्‍यांना कबाले मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांना शासकीय घरकुले मिळत नाहीत, त्यांना कबाले द्यावे, अशी मागणी लातूर तहसिलदार कांबळे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली. आखरवाई जवळील साठवण तलावातील पाणी १५ एचपीची मोटार लावून झाडांना पाणी देण्यासाठी वन विभाग घेऊन जात आहे, ते बंद करून पिण्यासाठी वापर करावा. मजुरांसाठी मागणी प्रमाणे कामे चालू करावीत, अशा सूचना माजी आमदार कव्हेकर यांनी यावेळी केल्या.


Comments

Top