HOME   लातूर न्यूज

अधिग्रहण व टॅकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत

लातूर तालुका काँग्रेस कमिटीची उप विभागीय अधिकार्‍यांकडे मागणी


अधिग्रहण व टॅकरचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत

लातूर: लातूर तालुक्यातील बहुतांश गावात पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गावपातळीवरील पाणी टंचाई पाहता टँकर, विंधन विहीर अधिग्रहणासाठी मागणी होत आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे प्रस्ताव देऊन जवळपास महिना झाला तरी अद्याप कुठल्याही ग्रामपंचायतीला अधिग्रहण किंवा टँकरची मंजुरी मिळाली नाही. परिणामी टंचाईग्रस्त गावात पाण्यासाठी नागरीकांना मनस्ताप होत आहे. लवकरात लवकर अधिग्रहण करून तात्काळ मदत करावी अशी मागणी करणारे निवेदन उपविभागीय अधिकरी रामेश्वर रोडगे यांना देण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
लातूर पंचायत समितीकडे तालुक्यातील सर्वच गावात तीव्र पाणीटंचाई असल्या बाबतची माहिती उपलब्ध आहे. यामध्ये तांदुळवाडी, खंडाळा, साखरा, हिसोरी, रमजानपूर, बोरी, धनेगाव, सलगरा, शिवणी खु., येळी, पिंपरी आंबा, नागझरी, शिराळा, उमरगा, धनेगाव, सारसा, चिखुर्डा, वरंवटी, पिंपळगाव आंबा, गंगापूर, मसला, खुंटेफळ, महापूर, सोनवती, रुई, भोयरा, कारसा, कृष्णानगर, करकट्टा, बोरगाव, भोसा आदी गावांत तीव्र पाणी टंचाई आहे. या सर्वांनी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दिले आहेत. काही गावात टॅकरची मागणी करण्यात आली आहे. शासनाने मागणी प्रमाणे टँकर व अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करावेत अशी मागणी उपविभागीय अधिकरी रामेश्वर रोडगे यांना निवेदनाद्वारे तालूका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी पंचायत समिती सभापती शितल फुटाणे, तालूका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडिले उपसभापती दत्तात्रय शिंदे, बाजार समिती उपसभापती मनोज पाटील, जि.प.सदस्य परमेश्वर वाघमारे, नगरसेवक रविशंकर जाधव, संचालक तूकाराम आडे, भिमाशंकर शेटे, रमेश थोरमोटे, जयदेव मोहिते, गणेश ढगे, रामराव चामे, योगेश माडे, प्रताप पाटील, गटनेता प्रकाश उपाडे, सरपंच सूर्यकांत सूडे आदी उपस्थित होते.


Comments

Top