HOME   लातूर न्यूज

विकासासाठी मुरुड शहर दत्तक घेणार- अभिमन्यू पवार

ट्रामा केअर, सबस्टेशन आणि नगर पंचायतीची लवकरच घोषणा


विकासासाठी मुरुड शहर दत्तक घेणार- अभिमन्यू पवार

मुरुड: भाजपा सरकार जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. याच भुमिकेतूनन विकासासाठी मुरुड शहर दत्तक घेणार आहे. मुरुडचा विकास गतिमान व्हावा यासाठी शहराच्या ग्रामपंचायतीचे लवकरच नगरपंचायतीत रुपांतर करू. शहरासाठी ट्रामा केअर हॉस्पिटल आणि १०० खाटांचे रुग्णालय आणि ३३ के व्ही सबस्टेशनला लवकरच मंजूरी दिली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यानी दिली.
मुख्यमंत्र्यांची शिफारस आणि अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा यामुळे बिदर-मुंबई रेल्वेला मुरुड येथे थांबा मंजूर झाला. गुरुवारी रात्री मुंबईकडे जाणाऱ्या या गाडीला मुरुड स्थानकावर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यापूर्वी मुरुडकरांनी ३६ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केल्याबद्दल पवार यांचा जंगी सत्कार केला. यावेळी पवार बोलत होते. या कार्यक्रमास खा. सुनिल गायकवाड, ग्रामीणचे नेते रमेश अप्पा कराड, हणमंत नागटिळक, अण्णासाहेब टेकाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
रेल्वेला थांबा मिळवून दिल्याबद्दल आनंदात असणाऱ्या मुरुडकरानी रेल्वे स्थानकावर रोषणाई करून रेल्वेचे स्वागत केले विविध संस्था, संघटनांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. मुरुड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी लातुरचे तहसीलदार कांबळे यांच्यासह पंचायत समितीचे गटनेते भैरवनाथ पिसाळ, नगरसेवक चंद्रकांत बिराजदार, नितीन वाघमारे, राजू आकनगिरे, गोविंद नरहरे, बन्सी भिसे, अनंत कणसे, अभिजीत कणसे, रेल्वे बोर्डाचे सल्लागार निझाम शेख उपस्थित होते.


Comments

Top