HOME   लातूर न्यूज

ग्रंथ दिंडीने ग्रंथोत्सवाला सुरुवात

खासदार, महापौरांनी केले ग्रंथ पालखीचे पूजन


ग्रंथ दिंडीने ग्रंथोत्सवाला सुरुवात

लातूर: उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने ग्रंथोत्सवानिमित्त मगळवारी सकाळी १० वाजता आयोजित ग्रंथदिडीने लातूकराचे लक्ष वेधून घेतले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते, महापौर सुरेश पवार व प्रा.डॉ. भास्कर बडे यांच्या प्रमुख उपस्थिती ग्रंथपालखीचे पूजन करण्यात आले. ही ग्रंथदिंडी मुख्य रस्त्याने हनुमान चौक-गुळमार्केट ते दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृहापर्यंत काढण्यात आली. ग्रंथोत्सव २०१७ च्या सहा सत्रापैकी मगळवारी सकाळी १० वाजता पहिले ग्रंथदिंडीचे होते. या ग्रंथ पालखीत मांडलेल्या भारतीय संविधान, महात्मा फुले साहित्य कृती, श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा, समग्र लोकमान्य टिळक, श्री ज्ञानेश्‍वरी, भगवद्गीता, सामाजिक न्याय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यां ग्रंथांचे पूजन करुन जि.प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर सुरेश पवार,प्रा.डॉ.भास्कर बडे, डॉ.नागोराव कुंभार,सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर,मराठवाडा तथा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ऍड.त्र्यंकबदास झंवर,जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे,जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, जिल्हा ग्रंथालयातील सोपान सातभाई, बाळासाहेब देवणे, जिल्हा सार्वजनिक ग्रथालय संघाचे कार्यवाह राम मेकले,उपाध्यक्ष पांडुरंग अडसुळे, युवराज जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर कापसे, हावगीराव बेरकीळे,सदस्य राम मोतीपवळे, अमित म्हेत्रे, काशिनाथ बोडके,
गुप्तलिंग स्वामी, आत्माराम कांबळे, पाटील,विठ्ठल कटके, जहांगीर सय्यद, बाळ होळीकर आदी उपस्थित होते.


Comments

Top