HOME   लातूर न्यूज

परप्रांतीय बालकांनी दिल्या गोड आठवणी, महोत्सवाची सांगता

बाल महोत्सवातील सुसंस्कारीत उद्याचा भारत घडवतील- अमित विलासराव देशमुख


परप्रांतीय बालकांनी दिल्या गोड आठवणी, महोत्सवाची सांगता

लातूर: विलासराव देशमुख फाऊंडेशन संचलित गोल्ड क्रेस्ट हाय आणि राष्ट्रीय युवा योजना नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बाल आनंद महोत्सवाने विविधतेत एकतेचा संदेश दिला. या महोत्सवातील सहभागी १८ राज्यातील बाल पाहुण्यांसोबत लातूरकरांच्या गोड आठवणी कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. महोत्सवाची यशस्वी सांगता झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार देशमुख यांनी म्हटले आहे, बाल महोत्सवातील सुसंस्कारीत उद्याचा भारत घडवील. विविध राज्यातून आलेले चिमुकले आता परतीच्या प्रवासावर निघाले आहेत़ थोर गांधीवादी नेते डॉ. एस. एन. सुब्बाराव यांच्या सानिध्यात गोल्ड क्रेस्टच्या प्रांगणातील सहा दिवसांचे वास्तव्य आदर्श नागरिक घडविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रगल्भ विचारांची शिदोरी घेऊन ही मुले विविधतेने नटलेला देश एकसंघ ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही आ. देशमुख यांनी व्यक्त केला.
लातुरातील पालकांचे कौतुक
महोत्सवासाठी देशभरातून १८ राज्यातील आलेल्या बाल पाहुण्यांना लातूर शहरातील मित्र मिळाले. सर्वधर्म समभावाचे कौटुंबिक वातावरण निर्माण झाले. मुलांबरोबर पालकांनीही उत्साह दाखवला. आयोजनातील बालक, पालक आणि संयोजन समितीच्या परिश्रमाने गोल्ड के्रस्टच्या प्रांगणातील राष्ट्रीय बाल आनंद महोत्सव यशस्वी झाल्याची प्रतिक्रियाही आ. देशमुख यांनी दिली आहे.


Comments

Top