HOME   लातूर न्यूज

२७ नोव्‍हेंबर २०१८ पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम

लातूर मनपा वतीने राष्‍ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन


२७ नोव्‍हेंबर २०१८ पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम

लातूर: संपूर्ण राज्‍यात २७ नोव्‍हेंबर २०१८ पासून गोवर रुबेला लसीकरण मोहिम (Measles Rubella-MR) राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेमध्‍ये ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील विदयार्थ्‍यांना गोवर रुबेलाची (Measles Rubella-MR)संयुक्‍त लस दिली जाणार आहे. ही मोहिम निश्‍चीत रोजी निश्‍चीत शाळेमध्‍ये सकाळी ०९ ते सायंकाळी ०५ या प्रमाणे ०८ जानेवारी
२०१९ पर्यंत राबविण्‍यात येणार आहे.
लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी शाळा,मनपा शाळा व जि.प.शाळामधून ही मोहिम २७ नोव्‍हेंबर पासून राबविण्‍यात येणार आहे.यासाठी एकूण ३५६ शाळामधील 1,08,688 विदयार्थ्‍यासाठी लसीकरणाची सोय प्रत्‍येक शाळेमधून करण्‍यात आलेली आहे. दररोज 7 ते 8 शाळामधून ही मोहिम राबविली जाणार आहे.याबाबतची माहिती लातूर शहर महानगरपालिका www.mclatur.org या संकेत स्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात आलेली आहे.शाळेतील लसीकरण मोहिम संपल्‍यानंतर 9 महिने वयोगटाच्‍या पुढील परंतू शाळेत न जाणा-या विदयार्थ्‍यासाठी बाहय संपर्क सत्रे आयोजीत करण्‍यात येणार आहेत. ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील एकूण 1,21,143 विदयार्थ्‍यांना सदरील लस इंन्‍जेक्‍शनद्वारे दिली जाणार आहे. प्रत्‍येक विदयार्थ्‍यासाठी स्‍वतंत्र ए.डी. सिंरीज वापरण्‍यात येणार आहे.


Comments

Top