लातूर: देशात आणि राज्यात बदलत्या राजकारणाची चाहूल लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मंगळवारी लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसेचे राज क्षिरसागर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बाभळगाव येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना अमित देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि युवा नेते पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेत आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी आज अनेक लोक इच्छुक आहेत. पक्षाचा विचार मान्य असण्यायांना पक्षात घेऊन संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लातुरात आज ज्या मंडळींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, त्या सर्वांना सन्मान देवून योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल, असेही देशमुख म्हणाले.
लोकनेते विलासराव देशमुख यांचा विचारच लातूर तसेच राज्याच्या विकास प्रक्रियेला गती देवू शकतो, याची अनुभूती सामाजिक कार्यकर्त्यांना आल्यामुळे राज्याचे युवा नेते आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष राज क्षिरसागर यांनी यावेळी सांगीतले. लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या मनसेचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष राज क्षिरसागर, शहर उपाध्यक्ष सुशिल खरोसे, विभाग प्रमुख आकाश शिंदे, विशाल जाधव, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष चंदू बागडे, महिला आघाडीच्या रत्नमाला सुरवसे, आशा घोडके तसेच छोटू मसके मित्र मंडळचे विभाग प्रमुख योगेश डोंगरे, विजय गव्हाणे, आश्रुबा लोंढे, विनायक गोरे, अजय सकटे, शेख जमीर, दयानंद उफाडे, रवी अर्जुने, शेख असलम, राजेश चव्हाण, अॅड. किशोर शिंदे, राजू उफाडे, सुरज लोंढे, सरवदे मामा, नेताजी जाधव या प्रमुख पदाधिक्यायांसह त्यांच्या सोबत आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, बालासाहेब देशमुख, सचिन बंडापल्ले, कैलास कांबळे, विद्याताई पाटील, महेश काळे, लातूर शहर युवक काँग्रेसचे निरिक्षक डॉ. दिनेश नवगिरे, सिकंदर पटेल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments