लातूर: केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने देशातील लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेला अनेक आश्वासने दिली. काँग्रेस पक्षावर टूजी स्प्रेक्ट्रम सारखे अनेक खोटे आरोप केले. त्यामुळे काँगे्रस पक्षाला मागील निवडणुकीत हार मानावी लागली होती. काँग्रेस पक्षात निस्तेजपणा निर्माण झाला. या परिस्थितीमध्ये नांदेड महापालिकेत काँग्रेस पक्षाला अभूतपुर्व विजय केवळ खा. अशोकराव चव्हाण यांच्यामुळे मिळाला. या विजयाचा संदेश राज्यात नव्हे तर देशातील काँग्रेस कार्यकर्ते व नेते यांना बळ देणारा ठरला. त्यांनंतरही विधानपरिषद, जिल्हा परिषद मध्ये विजय संपादन करून काँग्रेस पक्षाची शक्ती त्यांनी वाढवली, असे प्रतिदपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रावणगांव येथील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते विकास कामांचा शुभारंभ व सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागोलीकर, लातूर जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, काँग्रेसचे जेष्ट नेते आप्पाराव देशमुख, बालासाहेब बारडकर, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर आदी उपस्थित होते.
Comments