HOME   लातूर न्यूज

डॉ. सुनील गायकवाड यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर


डॉ. सुनील गायकवाड यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर

लातूर: नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटी शासकीय स्वयंसेवी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मानाचा ‘भारत गौरव पुरस्कार’ खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
दिल्ली येथील या संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागरिक, संस्थांना हा भारत गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. डॉ. सुनील गायकवाड यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच सुपरस्पेशालिटी रुग्णालय मंजूर करून घेतले. मतदारसंघातून ९ हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले, रेल्वेचे जाळे निर्माण केले, यासह शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून लातूरच्या विकासात भर घातली आहे. यामुळे या संस्थेच्या वतीने डॉ. सुनील गायकवाड यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर केला आहे. नवी दिल्ली येथे सोमवार, २४ डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
डॉ. सुनील गायकवाड यांनी मागील साडेचार वर्षांतील कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामांबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत. त्याच प्रमाणे मागील सहा महिन्यांपूर्वीच त्यांना ‘संसदरत्न’ हा पुरस्कारही मिळाला आहे. आता त्यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. सुनील गायकवाड यांना मिळालेल्या या भारत गौरव पुरस्काराबद्दल त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, लातूर शहर भाजपचे अध्यक्ष शैलेश लाहोटी, रमेशप्पा कराड, शैलेशे गोजमगुंडे, नगरसेवक प्रवीण अंबुलगेकर, हरिभाऊ गायकवाड, बाबूराव बोडके, रमाकांत बानाटे, रामलिंग पटसाळगे, बलभीम टोंपे यांनी अभिनंदन केले आहे.


Comments

Top