भोईसमुद्रगा : त्यागाची, बलिदानाची, विकासाची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या कॉंग्रेस पक्षाने भारताच्या विकासात मोलाचे योगदान दिले असून कॉंग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांच्या हिताची आहे त्यामूळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने कॉंग्रेस पक्षाच्या हातात सत्ता देऊन वैभवाचे व समृध्दीचे दिवस पून्हा एकदा आणावेत असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुख्म यांनी केले
भोईसमुद्रगा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरओ प्लान्टच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. शितल फुटाणे, उपसभापती दत्ता शिंदे, जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडीले, विजय देशमुख, गोविंद बोराडे, परमेश्वर वाघमारे, वसंतराव उफाडे, प्रकाश उफाडे, रघुनाथ शिंदे, अनंत बारबोले, सौ.लक्ष्मीबाई रोंगे, लक्ष्मण वाघमारे, तानाजी फुटाणे, अजित काळदाते, बापू शिंदे, ज्ञानेश्वर भिसे, महेश चव्हाण, ऋषिकेश मुटकुळे, गणेश सोमासे, मनोज चिखले, शिवाजीराव देशमुख, नानासाहेब रोंगे, नरसिंग रोंगे, कल्याण देशमुख, लालासाहेब देशमुख, कमलाकर वाघमारे, नवनाथ गायकवाड, बालासाहेब देशमुख, अर्जून सालमे, ज्ञानेश्वर चोथवे, शेषेराव गायकवाड, मधुकर रोंगे, सुग्रीव साबळे, राहुल रोंगे, चंद्रकांत रोंगे, राजकुमार सरवदे आदींची उपस्थिती होती.
पूढे बोलताना ते म्हणाले की विकासरत्न विलासरावजी देशमुख यांच्या विचाराने कार्य करणारे आपण सारे एकदिलाने लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी अविरतपणे काम करत आहोत कॉंग्रेस विचाराचे सरकार केंद्र व राज्यात नसल्यामुळे निश्चितच विकास कामास खीळ बसली आहे. दुष्काळाच्या झळा बसत असताना देखील हे सरकार ऊपाय योजनांच्या बाबतीत पूर्णपणे असमर्थ ठरत आहे. म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही असे सांगून ग्रामीण भागातील महीला स्वावलंबनासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. हे चिञ समाधान कारक असल्याचे धीरज देशमुख म्हणाले. या प्रसंगी सेंद्रिय भाजीपाला ऊत्पादन करणा-या मंगल मारूती वाघमारे यांचा देशातील १४ महिलांमध्ये समावेश होऊन दिल्ली येथे मान सन्मान झाल्याने धीरज देशमुख यांच्या हस्ते श्री व सौ वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शितल फुटाणे यांचे भाषण झाले तर प्रास्ताविक कल्याण देशमुख यांनी केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, कॉंग्रेस कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर वाघमारे यांनी केले.
Comments